व्हीएसआरएस मराठी न्युज –गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.
Discussion about this post