व्हीएसआरएस मराठी न्युज गोवा-पणजी-गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफ काल संध्याकाळी 6 वाजता थंडावलेआहेत. सोमवारी 14 फेब्रुवारी ला विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होत आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय धुरळा उडवित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच 10 पक्ष आपले नशीब अजमावून पाहणार आहेत.; भाजप, काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्र वादी गोमंतक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिव्हॉलूषणारी गोवन, संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपने प्रथमच सर्व 40 जागा लढवल्या आहेत आहेत. रिव्हॉलूषणारी गोवन पक्ष ही सर्व जागांवर निवडणूक लढवीत आहे. काँग्रेस ने 37 जागांवर उभे केले असून युतीत असणाऱ्या गोवा फॉरवर्ड ला 3 जागा देण्यात आल्या आहेत. आप 39, तृणमूल 26, मगोप 13, राष्ट्रवादी 12, शिवसेना 10 तर संभाजी ब्रिगेड 3 जागा लढवीत आहेत. 40 जागांसाठी 9 पक्ष आणि अपक्ष असे 301 उमेदवार रिंगणात आहेत.
यंदा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे प्रचारात सहभागी झाले होते.
Discussion about this post