व्हीएसआरएस मराठी न्युज –ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सत्ता संघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच, गेल्या ८ महिन्यांपासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. अश्यातच ठाकरे गटाकडून आणखी एक भर पडली ती म्हणजे, उल्हासनगर मधील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर लिखित ‘गद्दारांना क्षमा नाही’ या सध्याच्या राजकीय घडामोडींवरील वैशिष्ठ्यपूर्ण लेखाच्या संग्रहाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार भास्कर जाधव, आमदार रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post