व्हीएसआरएस मराठी न्युज -भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो हा मोठा लावण्यात आल्यामुळे तो विठ्ठल भक्तांचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विट करत या बॅनरवरती आक्षेप घेतला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.’ असं ट्विट करत त्यांनी या फोटोवर आक्षेप घेतला आहे.
शिवाय हे बॅनर काढून टाकावे आणि विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.
Discussion about this post