व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गौरवला भिमरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत गौरव म्हणाला की, ”भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२. खरच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये.
सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे.”
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब, मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो.सर्व प्रेकक्षकांचे आभार मानतो.
माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून गौरवने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रामधून.यामुले तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. गौगवनं संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटात देखील काम केलं आहे.
Discussion about this post