व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडी पुलाखाली प्राधिकरणकडे रोडवर आणि पिंपरी कडून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर फुटपाथवर मोठ्या संख्येने अतिक्रमण दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ आणि फ प्रभाग दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. या चौकातून महापालिकेचे शेकडो अधिकारी येजा करतात. मात्र त्यांना संपूर्ण फुटपाथ लहान मोठे व्यवसायिक यांनी व्यापून टाकलेला उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाही.असे सचिन काळभोर यांनी सांगितले .
महाराणा प्रताप पुतळा समोर हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय करत आहे. फुटपाथ संपूर्ण बंद करण्यात आला आहे.
रस्त्यावर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली जात आहे. रस्त्यावर नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रिक्षा चालक व हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण खुप मोठ्या प्रमाणात केले असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी व्हीएसआरएस न्युज यांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
Discussion about this post