व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी-भोसरी भागातील लांडगे वस्ती या ठिकाणी भोसरी परिसरात ही मुलं सायंकाळी खेळत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्यांनं जीवघेणा हल्ला केला. या भटक्या कुत्र्यानं श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड या दोन मुलांच्या चेहऱ्याला चावा घेतला . कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, या दुर्घटनेमुळं पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असतानाच पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळतीय भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला असून. या हल्ल्यात श्रीजित काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. श्वान परवाना ऑनलाइन केल्यामुळे अनेक श्वान मालक परवाना घेत आहेत. ऑनलाइन परवान्याची मुदत परवाना प्राप्त झाल्यापासून एक वर्षापुरती असणार आहे. दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. श्वानास रेबीज लसीकरण करणे बंधनकारक आहे. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर श्वानास मोकळे सोडता कामा नये. कोणत्याही व्यक्तीने परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये. परवाना घेतला असेल आणि त्याचे नूतनीकरण केले नसल्यास विना परवाना श्वान पाळला आहे असे समजण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात येईल. -संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
Discussion about this post