व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -आज राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
या भेटीत माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याने दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचा, पक्षाच्या नावाचा वापर करता येणार नाही. शिंदे गट व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सध्याचा काळ म्हणजे खूप महत्त्वाचा व निर्णायक ठरत आहे. या निर्णयानंतर दोन्हीकडून राजकीय हालचालीना वेग आला असून, बैठकांच सत्र तसेच गाठीभेट वाढल्या आहेत. दरम्यान, याच धरतीवर आज काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
Discussion about this post