व्हीएसआरएस मराठी न्युज -दरोड्याच्या गुन्ह्यात २० वर्षापासुन फरार असलेल्या एका आरोपीला जेरबंद करण्यात पिंपरी चिचवड गुन्हे शाखा युनीट – २ च्या पथकाला यश आले आहे. स्वतःचे अस्तित्व व ओळख लपवुन तसेच नाव बदलुन हा आरोपी पोलीसांना गुंगारा देत होता.
फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख (वय- ३७ वर्ष, रा. पुनम चेंबर्स, खराळवाडी, पिंपरी, सध्या फेरी व्हाइट फ्लॅट, नंबर २०३, युनीटी पार्क जवळ, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये गुन्ह्यात फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार हे पाहिजे आणि फरारी आरोपी यांचा कसोशीने तपास करीत आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख हा गेली २० वर्षापासुन पोलीसांच्या हाती लागलेला ओळख पटु नव्हता. स्वतःची नये. या करिता तो स्वतःचे नाव बदलुन पोलीसांना सातत्याने गुंगारा देत होता. पिंपरी पोलीस गेली २० वर्षापासुन त्याचा शोध घेत होते.
गुन्हे शाखा युनीट २ चे – पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि टिम ने फरार आरोपी फजल उर्फ फैजुर रहमान शौकत अली शेख याचा शोध सुरु केला. आरोपी
फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख याचा शोध सुरु असताना तपास पथकातील पोलीस हवालदार जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली की. आरोपी फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा या परीसरात राहत आहे. तेथील रिलायबल ट्रेडिंग या कापड दुकानात येणार आहे. वरिष्ठांच्या परवानगी ने गुन्हे शाखा युनीट – २ चे तपास पथक दुकान परीसरात सापळा लावुन थांबले.
पोलीसांनी आपल्याला सापळा लावला आहे. हे लक्षात
येताच आरोपी फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख हा पळुन जावु लागला. मात्र, गुन्हे शाखा युनीट -२ च्या पथकाने त्याचा पाठलाग करुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
पोलीसांनी आरोपी फजल उर्फ फैजुर रेहमान शौकतअली शेख याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली पोलीसांना दिली.
आरोपी फजल उर्फ फेजुर रेहमान शौकतअली शेख याला पुढील कारवाई करीता पिंपरी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत. य
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व गुन्हे शाखा युनीट -२ चे पोलीस अंमलदार यांनी हि कारवाई केली आहे.
Discussion about this post