व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सोमवारपासून (२४ ऑक्टोबर) पुढील आठ दिवस प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपयांऐवजी ३० रुपये करण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्मवर प्रवाशाला सोडविण्यासाठी अनेकजण येत असल्याने स्थानकावरील गर्दीत वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने पुणे रेल्वेने दिवाळीच्या कालावधीत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपयांऐवजी ३० रुपयांना मिळेल. नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर आणि स्थानकाच्या परिसरात विनाकारक गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post