व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 9 मे 2023 पासून सुरू असलेले अभियान आज वीस दिवस पूर्ण करत आहे या अभियानांतर्गत संपूर्ण शहरभरामध्ये जयभारत सत्याग्रह सभा आणि पोस्टकार्ड अभियान या संयुक्त अभियानाद्वारे शहर काँग्रेसच्या वतीने तयार केलेल्या दोन प्रचार वाहनांद्वारे जनतेसमोर सत्य आणून सत्ता परिवर्तन करण्यासाठी आणि जनतेच्या मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी सत्याग्रह सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनतेचा आवाज केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारपर्यंत एका साधारण पण वेगळ्या मार्गाने लेखी स्वरूपात पोहोचवण्यासाठी सर्वसामान्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्डद्वारे आपल्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये अवगत करून देऊन यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे, त्यांना त्यांच्याच वाचनाची आठवण करून दिली जात आहे आणि त्यांच्या जबाबदारी प्रती जागरूक करण्यासाठी नागरी सहभागातून पोस्ट कार्ड पाठविण्याचा उपक्रम काँग्रेस राबवत आहे.
निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानापासून भक्ती आणि शक्तीची प्रेरणा घेत काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.कैलास भाऊ कदम यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेले हे अभियान प्राधिकरण, आकुर्डी, अजंठा नगर, साने चौक, मोरे वस्ती, घरकुल, कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, तळवडे, मोहन नगर, रामनगर, आनंदनगर, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, भाटनगर, बलदेव नगर, शास्त्री नगर, दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, कस्पटे वस्ती, कावेरी नगर, थेरगाव, डांगे चौक, वाकड कासारवाडी, फुगेवाडी या ठिकाणी आजवर राबविण्यात आले आहे, यापुढे देखील उर्वरित सर्व भागांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे.
हे अभियान सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत दैनंदिन स्वरूपात वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये राबविण्यात येत आहे याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून रोज शेकडो नागरिक पोस्टकार्ड भरून आपला निषेध नोंदवत आहेत.
कार्यक्रम स्वरूप: काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रोज चार याप्रमाणे रोज चार सभांच्या माध्यमातून आपल्या वक्तृत्वा द्वारे केंद्रातील मोदी सरकारचा, राज्यातील सरकारचा आणि महानगरपालिकेतील भाजपने केलेला चुकीचा कारभार याबाबत नागरिकांसमोर खुलासा करत सत्यसमोर आणत आहेत तशी पत्रके वाटप करत आणि सत्ता परिवर्तनाचा संकल्प नागरिकांकडून करून घेत आहेत सभा झाल्यानंतर नागरिकांकडून पोस्टकार्ड भरून घेतले जातात अशा पद्धतीचा नियोजन दैनंदिन स्वरूपात असते.
हे अभियान राबवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते झोकून देऊन काम करताना दिसून येत आहेत आणि या सर्वांना पाठबळ देण्याचे काम शहर काँग्रेसचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते, धडाडीचे कामगार नेते, इंटक चे प्रांताध्यक्षा मा. कैलासभाऊ कदम हे करत आहेत.
Discussion about this post