व्हीएसआरएस मराठी न्युज कुलदैवत निमगाव खंडोबा बैलगाडा शर्यतीच्या घाटात सकाळपासुन बैलगाडा शर्यती उत्साहात सुरु असुन आज दुपारी या बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे घोडीवर टाप टाकणार अशी चर्चा होती.
मग काय कोल्हेनी शब्द पाळला आणि थेट घाटात बारीसमोर घोडी पळवली. यांने अमोल कोल्हेंनी प्रचारा दरम्यान दिलेला शब्द पाळला असल्याचे म्हणावे लागेल. डॉ अमोल कोल्हे भिर्रर्रच्या शर्यतीत घोडीवर टाप मारणाल्याने नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.
दरम्यान मागच्या अनेक वर्षापासून बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरु झाली आहे. ती शर्यत सुरु होण्याची राष्ट्रवादीचे खासदरा अमोल कोल्हे यांनी संसदेत कायम मुद्दा उचलून धरला होता. शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनीही शर्यत सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि त्यानी अमोल कोल्हेंना आव्हान दिले होते की त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि बारीमध्ये घोडीवर बसावे. आज तोच शब्द अमोल कोल्हेंनी पाळलेला पाहायला मिळाले. १३ -१४ सेकंदात ही बारी अमोल कोल्हेंनी मारली आहे.
Discussion about this post