व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पाठलाग करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार कोटी रोकड ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी महेश नाना माने (चालक), विकास संभाजी घाडगे या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना (Lonavla Rural Police) मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच एक पथक तपास करत होते. यावेळी KA-53-MB-8508 मारुती स्विफ्ट ही गाडी भरधाव पुण्याच्या दिशेने येत होती. पोलिसांनी या गाडीस हाथ दाखवून थांबवण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गाडीला थांबवले.
यावेळी गाडीची तपासणी केली असता चोर कप्प्यात तब्बल चार कोटी रुपये पोलिसांना आढळले. या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत. ही कारवाई लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Discussion about this post