व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच यावेळी हनुमान चालीसाचे सामुहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे.
दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत. सुमारे २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्यांचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.
Discussion about this post