व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्य सरकारने जिल्हा परिषदेसह अनुदानित इतर शाळांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने तब्बल ३५ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार असून त्यासाठी राज्य शासनाने तब्बल २२१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना हे गणवेश दिले जातील. इयत्ता १ली ते ८वी वर्गातील मुली, अनुसूचित जाती जमाती संवर्गातील मुले-मुली तसेच दारिद्र्य रेषेखालील मुलांना गणवेशाचा लाभ मिळेल. मागील २ वर्षांत करोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी या अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना २ गणवेश दिले जातील. सदरील गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिले जाणार आहेत.
अहमदनगर १ लाख ५७ हजार, अकोला ६७ हजार, अमरावती १ लाख २७ हजार, औरंगाबाद १ लाख ५२ हजार, भंडारा ५५ हजार, बीड १ लाख १४ हजार, बुलडाणा १ लाख ३८ हजार, चंद्रपूर ८७ हजार, धुळे ९४ हजार, गडचिरोली ६३ हजार, गोंदिया ७४ हजार, हिंगोली ७० हजार, जळगाव १ लाख ६१ हजार, जालना १ लाख ६ हजार, कोल्हापूर १ लाख १९ हजार, लातूर ८५ हजार, नागपूर ७१ हजार, नांदेड १ लाख ६० हजार, नंदुरबार ९९ हजार, नाशिक २ लाख ८० हजार, मालेगाव १४ हजार, उस्मानाबाद ७५ हजार, परभणी ८४ हजार, पालघर १ लाख ६५ हजार, पुणे १ लाख ५९ हजार, रायगड ७८ हजार, रत्नागिरी ५१ हजार, सांगली ७६ हजार, सातारा ८३ हजार, सिंधुदुर्ग २४ हजार, सोलापूर १ लाख ५२ हजार, ठाणे ७० हजार, भिवंडी १४ हजार, वर्धा ३७ हजार, वाशीम ६१ हजार, यवतमाळ १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे. विविध जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना उपलब्ध आहे.
Discussion about this post