व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे शहरातील कसबा (Kasba) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad bypoll election) पोटनिवडणुकीची सध्या चर्चा आहे. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदासंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघामध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भाजपची इच्छा आहे.
दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत. “महाविकास आघाडीमध्ये काही नवीन प्रश्न उभे राहतील, अशी वक्तव्य करणार नाही. सत्यजीत तांबे यांच्याबाबत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बोलले आहेत. जे घडलं ते पुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
27 फेबु्रवारीला मतदान होत आहे. त्या निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण पुणे जिल्ह्यात बुधवार (दि.18) पासून लागू झाली आहे.
Discussion about this post