व्हीएसआरएस मराठी न्युज-शहरात विकासकामांमुळे बेसुमार कॉंक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी सर्व प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, कार्यालये, रहिवासी सोसायट्यांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे.
महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, शहरात नवीन गृह प्रकल्प उभारताना “रेन वॉटर हार्वेस्टिंग” अनिवार्य केले आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक गृह प्रकल्पांना मंजुरी देतानाच या अटीची माहिती दिली जाते. तसेच गृह प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी “रेन वॉटर हार्वेस्टिंग” प्रकल्प उभारला की नाही, याची पाहणी केली जाते. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो.
Discussion about this post