व्हीएसआरएस मराठी न्युज – शनिवार रोजी झालेल्या निवडणुकीत थेरगाव येथील पदमजी पेपर प्रोडक्ट कर्मचारी सह पतसंस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत नऊ पैकी सात जागावर मोरया पॅनल चे उमेदवार विजयी झाले.
मोरया पॅनल ला सात तर परिवर्तन पॅनल ला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.
पतसंस्थेचे चेअरमन श्री कालिदास वाडघरे व सचिव श्री संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गात श्री कालिदास वाडघरे ,श्री संजय पवार,श्री अभितकुमार परब, श्री संजय सुर्वे ,श्री जितेंद्र देव व श्री मारुती फराकटे हे मोरया पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
भटके विमुक्त विशेष मागास गटातून श्री सुजितकुमार ननवरे हे विजयी झाले अन्य मागासवर्ग प्रवर्गातून श्री सोमनाथ लोंढे हे विजयी झाले तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून श्री राहुल सरवदे हे विजयी झाले
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गजेंद्र सवाईकर यांनी काम पाहिले.
Discussion about this post