व्हीएसआरएस मराठी न्युज –
लांडेवाडी क्रिकेट मैदानात खासदार संजयजी राऊत यांची चौफेर “फटकेबाजी”!
◆ शिवसंग्राम प्रीमियर क्रिकेट लीग 2022 ला दिली भेट
–
शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते, राज्यसभा खासदार मा.संजय राऊत साहेब यांनी लांडेवाडी, ता.आंबेगाव येथे आढळराव वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंग्राम प्रीमियर क्रिकेट लीग 2022 ला भेट देत शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माझ्या सह शिवसेना संपर्कप्रमुख मा.राज्यमंत्री सचिनजी अहिर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली(आबा) कटके यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राजकारणात शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आज यांना फटकेबाजी केली. याप्रसंगी ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील सर्व निवडणुका एकत्र लढविण्यावर महाविकास आघाडीची एकमत झाले आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे. कोणी काहीही बोलले तरी आढळराव पाटील हे पुढील वेळी खासदार म्हणून संसदेत असतील. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनदेखील दुसऱ्याच दिवशी पासून पराभव बाजूला सारून ते जनसेवेच्या कामाला लागले, इथल्या लोकांशी त्यांची नाळ किती घट्ट जुळून आहे हे यावरून दिसून येते.
Discussion about this post