व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना आज तुरुंगातून दवाखान्यात घेऊन गेले आहेत.
नवाब मलिक यांची प्रकृती तीन दिवसांपासून खराब होत होती. त्यांनी विशेष न्यायालयात वैद्यकीय कारण दाखवून जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडीला आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आपलं म्हणणं दाखल करायचे होते. मात्र या दरम्यानच मलिक यांची प्रकृती खालावली आहे.
नवाब मलिक यांच्या वकिलांनी सांगितले की, मलिकांची प्रकृती मागील काही दिवसापासून खराब होत आहे. मलिकांची प्रकृती ढासाळल्यावर स्ट्रेचरवर त्यांना आर्थर रोड जेलमधून जे जे हॉस्पिटलला आणलं गेलं. ईडीने यावर विचारले आहे की, जर नवाब मलिकांची प्रकृती खराब होती तर तपास पथकांना का कळवलं गेलं नाही. यावर आता ईडीने पुढच्या तारखेला सुनवाईची मागणी केली आहे. मात्र न्यायालयाने सांगितले की, आरोपीच्या प्रकृतीचा प्रश्न जास्त महत्वपूर्ण आहे.
नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत. मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात ही माहिती दिली.
Discussion about this post