व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार उमा खापरे यांचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची भक्ती-शक्ती चौक ते मोरवाडी येथील पक्षकार्यालय पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. तसेच, विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी महापौर केशव घोळवे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश प्रमुख राजेश पिल्ले, महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा महिला मोर्चा कोषाध्यक्षा शैलजा मोळक, माउली थोरात, वैशाली खाडे, रेखा कडाली, आशा काळे, शोभा भराडे, कैलास सानप, प्रदीप बेंद्रे, राणी कौर, तेजस्विनी कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post