व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे.
सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या इतर उल्लंघनांवरही दंड आकारला जातो. बेपर्वा वाहनचालकांना शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे या प्राथमिक उद्देशाने आरटीओच्या पथकांनी ही कारवाई सुरु केली आहे. सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलिस उभे असतात. त्यात अनेक दुचारीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात. त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता नो पार्किंगच्या गाड्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे.
वाहतूक पोलिसांकडून दंडाची रक्कम ही रोख स्वरुपात घेतली जात नाही. तसंच अद्याप ई चलन मशिनवर युपीआय किंवा क्यू आर कोडचा पर्याय नाहीय. त्यामुळे सध्या फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच दंड स्वीकारला जात असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिलीय.
Discussion about this post