व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर आलीये. तो म्हणजे पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रूपये 20 पैशांची वाढ (CNG) करण्यात आली आहे.
सीएनजी गॅस प्रति किलो दोन रूपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, आधीच महागाई वाढत आहे.
पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाच्या दरात देखील भरमसाठ वाढ झाली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे सीएनजी देखील महाग झाला आहे.
दरम्यान, एकीकडे सीएनजीच्या दरात आज किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणेज आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
त्यापूर्वी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 68 रुपयांवरून थेट 73 रुपयांवर पोहोचले होते. आज पुन्हा एकदा दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत.
सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे सहा रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र दोनच दिवसांमध्ये कंपन्यांकडून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली.
दरम्यान, गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post