व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे
डाक विभागातर्फे जागतिक पोस्ट दिनानिमित आयोजित टपाल सेवा सप्ताहात (postal service week) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे विभागाने आयपीबीबी मार्फत जनरल इन्शुरन्स योजना देशात प्रभावीपणे राबवून पहिला क्रमांक मिळवला आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल १.६६ कोटी रुपयांचं प्रीमियम गोळा करण्यात आलं आहे. या सोबतच माझी कन्या सुकन्या, पीपीएफ खाते या सारख्या योजनाही प्रभावीपणे राबविल्या असल्याची माहिती पुणे डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली आहे.
पुणे पोस्ट विभागातर्फे ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान टपाल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना जायभाये म्हणाले की, पुणे टपाल क्षेत्राने आतापर्यंत पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएसआय) आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) योजनेअंतर्गत 8.9 लाखांहून अधिक लोकांचा जीवन विमा उतरवला आहे. यावर्षी पुणे क्षेत्राने ९९ टक्के दाव्यांचा निपटारा केला आहे. आय.पी.पी.बी च्या पुणे क्षेत्रात ६ शाखा असून त्यात आत्तापर्यंत ११ लाखाहून अधिक बचत खाती उघडल्या गेली आहेत. आय.पी.पी.बी ने या आर्थिक वर्षात १,१५,०४२ लोकांचा विमा जनरल इन्शुरेंस अंतर्गत केला आहे. पुणे टपाल क्षेत्र हे भारतात आय.पी. पी.बी मार्फत जनरल इन्शुरेंस योजना राबविण्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे देखील जायभाय यांनी सांगितले.
12 ऑक्टोबर रोजी “टपाल आणि पार्सल दिवस निमित्ताने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात पार्सल पॅकिंग यूनिट ची सुरुवात केली आहे. पुणे टपाल क्षेत्र भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसाठी योगदान म्हणून, योजना सुरू झाल्यापासून 8 ऑक्टोबर पर्यंत 5 लाख पेक्षा जास्त मुलींची संपूर्ण सुकन्या खाती उघडली आहेत. ही योजना इतर कोणत्याही बचत योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या व्याजापेक्षा उच्चतम व्याज दर 7.6% देते. आणि मुलींना सुरक्षित भविष्य प्रदान करते, असं देखील यावेळी जायभाये यांनी सांगितलं.
Discussion about this post