व्हीएसआरएस मराठी न्युज –कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर स्वर्गीय मुक्ताताई यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली.
निश्चितच मुक्ताताईंनी प्रस्तावित केलेली व त्यांच्या स्वप्नातील कसबा घडविण्यासाठी जी जी कामे आवश्यक आहे ती ती कामे पूर्ण करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. कसबा मतदारसंघ हा कुठल्याही पक्षीय राजकारणामुळे विभागलेला नाही तर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र घेत कसबाच्या विकासाची वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न या पुढील काळात माझा राहील. असे
रवींद्र धंगेकर म्हणाले .
रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.
Discussion about this post