व्हीएसआरएस मराठी न्युज -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं चांगलेच कंबरडे मोडले आहे. आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.
सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे.
पुण्यात आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पुण्यात आता सीएनजी ८० रुपये झाला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही चौथी वाढ झाली आहे.
Discussion about this post