व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी – विश्व श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष श्री लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली आकुर्डी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या आषढी वारी पालखी सोहळ्याचे आकुर्डी मध्ये स्वागत करण्यात आले.
विश्व श्रीराम सेनाच्या वतीने वारकरी आणि भाविकांना फराळ आणि अल्पोपहार, जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. आकुर्डी येथे मुक्कामासाठी पालखीसोहळा मार्गस्थ झाला. यावेळी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोविडच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत पढरपूर आषाढी वारी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी कोविडचे सावट दूर झाले आहेत. त्यामुळे पालखी सोहळा उत्साहात सुरू आहे. त्या वेळी पिंपरी चिंचवड मेडीकल टीम (ima) डॉ कामत ,डॉ विकास मंडलेचा,डॉ अनिरुद्ध टोणगांवकर ,डॉ दिपाली टोणगांवकर ,डॉ सुशिल मुथियान सोबत अनेक डॉ उपस्थित होते.