व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षापासून महागाई व जीवना वशक वस्तूंवरील GST चे दर वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज अख्ख्या राज्यभर काँग्रेस आंदोलन करत आहे.
आजचे आंदोलन सुरू करण्यापूर्वी कोथूर्णे, मावळ येथील बलात्कार करून हत्या केलेल्या पीडित अल्पवयीन मुलीला शहर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली.
हे आंदोलन पिंपरी चिंचवड येथे सुद्धा केले गेले.
पिंपरी बाबासाहेब पुतळा चौक, जवाळ आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात काँग्रेसने निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी केले. या आंदोलनाला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ कदम म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे.
बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. राज्यात कुठेही निवडणुका झाल्या तरी. केंद्र सरकारने मागायचे दर कमी करणार नाही. केंद्र सरकारला हा आमचा इशारा आहे. जर थोड्या दिवसात महागाचे दर कमी केले नाहीत तर आम्ही येथील पुढील काळात अख्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. असे कदम म्हणाले.
यावेळी केंद्र सरकारच्या, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Discussion about this post