व्हीएसआरएस मराठी न्युज –पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली – बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या या महानगरीत, मैदाना अभावी मुले घरातच टीव्ही पाहणे व मोबाइलवर गेम खेळण्यातच गुरफटून चालली आहेत. परिणामी लहान वयातच शारीरिक व मानसिक आजाराने कमकुवत होत चालली आहेत. याला कारण म्हणजे कोणता खेळ खेळायचा असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. बऱ्याच जणांना तर हे देशी खेळ माहीतच नाहीत.
म्हणूनच ओम प्रतिष्ठान संस्थेने सर्व वयोगटातील मुलांसाठी या पारंपारिक खेळाचे मोफत आयोजन केले आहे. यात विट्टी-दांडू, गोटया, भोवरा, चिपळ्या , सागरगोटे, चल्लस-आठ, रुमाल उडवी, कांदा-फोडी, कोया, चाकाची चक्री, लिंगोर्चा, आप्पा-रप्पी, गिलोरी, आट्या-पाट्या इत्यादी खेळ शिकविले जाणार आहेत.
या खेळांमुळे मुले सुदृढ तर बनतीलच. परंतु त्या सोबतच मुलांचे संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, निर्भीडपणा, चपळता, सांघिक वृत्ती, अचूक अंदाज बांधणी इत्यादी गुण वाढीस लागतात. परिणामी मुलांचे शारीरिक व मानसिक संतुलन विकसित होण्यास मदत होते.
पारंपरिक खेळाच्या माध्यमातून निखळ आनंद व मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी, सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा सहभाग अवश्य नोंदवावा असे आव्हाहन संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी केले आहे.
कालावधी
६ मे ते १० मे – सायंकाळी ५ ते ७
*स्थळ*
विद्यांगण हायस्कूल, लक्ष्मी नगर, भालचंद्र विहार जवळ, रावेत.
पूर्व नोंदणी आवश्यक
संपर्क क्रमांक :- 9881665151, 7798633344
घरातच बसून राहिल्यामुळे मुलांचा जो व्यायाम या वयात व्हायला हवा, तसा होत नसल्यामुळे मुलांना लहान वयातच आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. तासन््तास कॉम्प्युटसमोर बसल्यामुळे लहानपणीच मुलांना चष्मे लागत आहेत. शरीराची पुरेसी वाढ न होणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा अशा आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. लपंडाव, खो-खो, कबड्डी यांसारख्या खेळांमुळे मुलांचा शारिरीक व्यायाम होत असे. यामुळे मुलांचे आरोग्य देखील सुदृढ राहत होते. परंतु घरातच बसून मैदानी खेळ न खेळल्यामुळे आज मुलांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Discussion about this post