व्हीएसआरएस मराठी न्युज कुदळवाडी-रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोडींच्या उपाय योजनांबाबत प्रशासन लवकर निर्णय घ्यावे .
खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरूनही पडत आहेत.
कुदळवाडी भैरवनाथ मंदिर रोड ते मोई फाटा (जुना कुदळवाडी मुख्य रस्ता) येथील खड्डेच खड्डे प्रशासन गप्प.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहन चालकांमधून व रहिवासी यांच्या कडून होत आहे.
कुदळवाडी परिसरातील मुख्य रस्त्यावरील खड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा तसेच भैरवनाथ मंदिर रोड,जय गणेश वजन काटा,शिवसाई वजन काट्यासमोर भाग,रिगल रेसीडेन्सी समोरील भाग खराब रस्ता असल्याने . यामुळे या रस्त्यावर गंभीर अपघात होत आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली. खड्डे मुळे नागरिकांचे अपघात होत आहेत एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे का ?
खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक संथ गतीने होत आहे. या खड्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची पाहणी करून रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांच्या कडुन होत आहे.
काही दिवसांत खड्डेमुक्त रस्ते पाहायला मिळणार अशी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post