व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शिरूर मतदारसंघातील पाणंद रस्त्यांच्या विकासकामांसाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आलं असून जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील विविध गावांमधील एकूण सुमारे ४५ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे.
यापैकी जुन्नर तालुक्यातील सावरगाव, ओझर, ओतूर, बोरी खुर्द, डुंबरवाडी, आळे, येडगाव, कुमशेत या गावांमधील एकूण ११.७०० किलोमीटर, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील सरदवाडी, पाबळ, कान्हूर मेसाई, टाकळीहाजी / माळवाडी, आमदाबाद या गावांमधील एकूण ५.६५० किलोमीटर आणि शिरूर तालुक्यातील दहिवडी, शिरूर ग्रामीण, इनामगाव, तर्डोबाची वाडी, गणेगाव दुमाला, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, चव्हाणवाडी, तळेगाव ढमढेरे, डिग्रंजवाडी, सणसवाडी, वढू बु., वाजेवाडी, निमोणे, वाडा पुनर्वसन, तांदळी या गावांमधील एकूण २७ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
लवकरच या कामांना सुरुवात होईल. या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी बंधू -भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच खूप फायदा होणार आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळतंय, हे बघून त्यांना आनंद वाटत आहे. तसेच अजूनही इतर तालुक्यांचे प्रश्न बाकी आहेत. ते देखील लवकरात लवकर सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया च्या द्वारे मांडली आहे.
Discussion about this post