व्हीएसआरएस मराठी न्युज –किल्ले शिवनेरीवर सन १९८० पासून तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा होत असून या उत्सवास हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही मान्यता दिली होती.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार सध्या कार्यरत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवात सहभागी होऊन उत्सवास भरीव निधी द्यावा. तसेच तिथीनुसार होणा-या उत्सवानिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले आली.
Discussion about this post