व्हीएसआरएस मराठी न्युज –साईनाथ नगर, निगडी येथे तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. परिसरातील सर्व मुलांनी एकत्र येऊन चौकामध्ये भगवे झेंडे, रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले. महाराजांचे पोवाडे लाऊन परिसरामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली.
संध्याकाळी महाराजांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रे मध्ये साईनाथ नगर मधील समस्त नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील बाळ गोपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक श्री सचिन भाऊ चिखले, सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ येवले, नगरसेवक उत्तम भाऊ केंदळे, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ तापकीर, सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ बोराडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ सारिका ताई चव्हाण उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल साईनाथ नगर आणि एकता मित्र मंडळ यांनी केले. श्री प्रसाद फिरोदिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि श्री बालाजी जामदार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Discussion about this post