व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते हे राऊत यांच्या घराबाहेर जमले होते. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ( संजय राऊतांच्या अटकेवर काय म्हणाले त्यांचे बंधू?) दरम्यान, ईडीच्या ताब्यात असलेले संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात घेऊन गेले आहे.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर राऊत यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. तर दुसरीकडे, संजय राऊत अटकेनंतर मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जवळपास २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. १०० पोलीस ईडी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहे. तर 50 पोलीस हे जे जे हॉस्पिटलबाहेर आणि ५० पोलीस कर्मचारी हे सत्र न्यायालयात तैनात करण्यात आले आहे. तसंच 2 शिघ्रकृती दलाच्या फोर्स देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post