व्हीएसआरएस मराठी न्युज -श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी जिना करावा म्हणून ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते.
महासंघाने स्वतःच्या निधीतून जीना उभारण्याची घोषणा केल्यावर तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ व भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महासंघाचे पदाधिकारी व मनपा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली व 18 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यतिथी दिनापर्यंत जीना उभारण्याची घोषणा केली. आज श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 282 व्या पुण्यतिथी ला या जिन्याच्या कामाचे भूमिपूजन माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनपा सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मदन सिन्नरकर, मयुरेश अरगडे, बाजीराव पेशवा समितीचे कुंदनकुमार साठे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सनई चौघड्याच्या निनादात मंगलमय वातावरणात महिलांनी फुगड्या घालून ह्या उभारणीचा सोहळा साजरा केला. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बाजीराव पेशवा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
Discussion about this post