व्हीएसआरएस मराठी न्युज -: पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोमाटणे येथील टोलनाका अनाधिकृत असून तो कायमचा बंद व्हावा, या मागणीसाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली असून 9 मार्च रोजी तळेगाव दाभाडे शहर बंद ची हाक कृती समितीने दिली आहे.
या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जोशीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात रविवारी (दि.5) बैठक पार पडली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवार (दि.9) रोजी तळेगाव दाभाडे शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. शनिवार (दि 11) पासून सोमाटणे टोलनाका येथे बेमुदत निवासी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिला आहे. आवारे म्हणाले, हे आंदोलन कायद्याचे पालन करून अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे. सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर आहे.
या संदर्भातील सर्व कागदपत्रांचे पुरावे दिले आहेत. आमच्या आरोपात तथ्य आहे. सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे. यासंदर्भातील एक तरी पुरावा टोलनाका प्रशासनाने सादर करावा.
Discussion about this post