व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा लोकसंपर्क वाढावा, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना सांगावीत अशा उद्देशाने पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी डिजिटल सभासद नोंदणीची मोहीम राबविण्याचा आदेश दिला.
त्यानुसार देशभरात सभासद नोंदणी मोहीम दि. ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. पुणे शहरातही सर्व पेठा आणि उपनगरांमध्ये पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दि. ३० मार्च रोजी पुणे शहराला भेट देणार असून सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहेत,
सकाळी ११.०० वा.
स्वामी नारायण मंदिर येथे दर्शन
स्थळ: स्वामी नारायण मंदिर, अ१-ब१, मुंबई-बंगळूर नॅशनल हायवे-४, नन्हे अंबेगाव रोड,
नन्हे, पुणे.
सकाळी १२.०० ते १.०० वा. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष सभासद नोंदणी (डिजीटल) संदर्भात आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : पुणे शहर काँग्रेस कमिटी कार्यालय, पुणे
• दुपारी ३.०० ते ५.०० वा. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या द्विवार्षिक अधिवेशनास उपस्थिती स्थळ : कम्युनिटी हॉल, ताडीवाला रोड, पुणे
Discussion about this post