व्हीएसआरएस मराठी न्युज –दि. १२: दिल्ली येथील केंद्र सरकारच्या वस्तुसंग्रहालयात जतन केलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी ग्लोबल विपस्सना पॅगोडा, गौराई, मुंबई येथे हस्तांतरीत करण्या विषयाचे निवेदन व भगवान गौतम बुद्धाची मूर्ती राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना सहपरिवार प्रत्यक्ष भेटून दिल्याची माहिती माजी राज्यसभा खासदार श्री अमर साबळे यांनी दिली.
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने अंतर्गत श्री. अमर साबळे यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव अंबडवे (ता. मंडणगड जि. रत्नागिरी) हे गाव दत्तक घेतले आहे. केवळ २५४ लोकसंख्या गावांसाठी विशेष खास बाब म्हणून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. सदर गावाचा विकास रस्ते व स्मारकासाठी श्री. अमर साबळे यांनी केंद्र व राज्य सरकार कडून विशेष प्रयत्न करून रु. ५५४ कोटीची तरतूद करून घेतली आहे.
सदर गावास राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी सहपरिवार शनिवार दि. १२ फेब्रुवारी रोजी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस श्रद्धापूर्वक पुष्पांजली वाहून अभिवादन केले. याप्रसंगी माता रमाई व वडील रामजी सपकाळ यांच्याही प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली.
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश श्री. भूषण गवई, पालकमंत्री श्री.
अनिल परब, समाजकल्याण राज्यमंत्री संजय बनसोडे, भटके विमुक्त कमीशन अध्यक्ष श्री. दादा इदाते, माजी
राज्यसभा खासदार श्री. अमर साबळे, आमदार श्री. योगेश कदम आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
भगवान गौतम बुद्धांच्या जगात जतन केलेल्या अस्थी व दिल्ली येथील केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या बस्तु संग्रहालयात सुरक्षित ठेवल्या गेलेल्या भगवान गौतम बुध्द[]च्या अस्थिचे पवित्र्य व पूजन ग्लोबल
विपश्यना पॅगोड अधिक चांगले राखले जाऊ शकते अशी भूमिका श्री. अमर साबळे यांनी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या समोर विशद केली आहे.
बौद्ध तत्पशनावर श्रद्धा असलेल्या देशातील अनेक सामाजिक, धार्मिक संघटना तसेच म्यानमार, श्रीलंका, नेपाल, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, थायलंड, इत्यादी देशातील बौद्ध संस्थानी व संघटनांनी भारतातील विपस्सना ग्लोबल फाऊंडेशनचे संस्थापक आचार्य सत्यनारायण गोयका गुरुजी यांनी केलेल्या सदर मागणीस जोरदार समर्थन दिले आहे तसेच विश्व हिंदू परिषद तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष के श्री अशोक सिंहल यांनी २००७ साली सदर मागणीचे समर्थन केले असल्याची माहिती श्री. अमर साबळे यांनी सांगितली. सदर मागणी सदर्भात देशातील विपस्सना साधक प्रतिनिधींना एकत्र करून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची भेट मेऊन पाठपुरावा करणार असल्याचे श्री. अमर साबळे यांनी सांगितले,
Discussion about this post