व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई : फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमाताई अंधारे या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. यामुळे सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.
अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा सुषमा अंधारे यांचा निर्णय
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय मी घेतला असून यासाठी मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले.
Discussion about this post