व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी येथील आण्णा भाऊ साठेबस स्टाप शेजारी रेड झोन एरियामध्ये बेकादेशीरपणे शौचालय तसेच ४ दुकाने व गाळा बेकायदेशीर बांधण्यात आले आहे.
त्यासंदर्भात २४ नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालय ऑटो क्लस्टर चिंचवड ह्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र याची स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आला नाही. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.
तसेच लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्या ठिकाणी येऊन चर्चा करण्यात आली नाही. परिणामी आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी ७ डिसेंबर २०२२ रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे. सदर भष्टाचार प्रकरणी आयुक्तच सहभागी असून मुद्दामहून याबाबत कारवाई करण्यात येतं नाही.
दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त निवासस्थानी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे. आयुक्त निवासस्थानी ७ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता थाळीनाद आंदोलन करणार आहे
निवेदनात काळभोर यांनी सांगितले आहे.
Discussion about this post