व्हीएसआरएस मराठी न्युज वाकड-
वाकड पोलिस ठाणे हरितील सराईत गुन्हेगार शाहरुख युनुस खान याच्या टोळीवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)
(ii). ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – २ पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, सत्यवान माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे तसेच अंमलदार सचिन चव्हाण, पो.हवा ४१५ व्यंकट कारभारी, पो.ना. ११७८, पी.सी.बी. गुन्हे शाखा व स.पो.फौ. सुहास पाटोळे, वाकड पोलिस ठाणे यांचे पथकाने केली आहे.
Discussion about this post