व्हीएसआरएस मराठी न्युज -विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं, त्या निवडणुकीत विजयी झालेल्या दहा आमदारांचा आज शपथविधी आज संपन्न झाला.
विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभात भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेकडून भाई जगताप, शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
Discussion about this post