व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी: १८ मार्च २०२२ (शुक्रवार) ;- पिंपरी चिंचवड पाेलिस आयुक्तालयात आज हाेळी साजरी करण्यात आली.. पाेलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार बांधव व आपल्या पाेलिस सहकारी मंडळीसह साेबत हाेळी खेळले.
दिवाळी, दसरा, शिमगा असो वा पाडवा, ईद असो अथवा बुद्धजयंती, कोणत्याही सणाच्या दिवशी पोलिसांना सुट्टी नसते. आजही होळीच्या दिवशी पोलीस कर्तव्य बजावत होते. एकीकडे रंगाची धुळवड उडत होती. रंगीबेरंगी चेहरे सर्वत्र हसत-खेळत फिरत होते तर पोलिस मात्र कर्तव्याचा रंग उडवत होळी साजरी करत होते. सर्वसामान्य जनतेच्या समाधानात, आनंदात आनंद मानणाऱ्या पोलीस दलाच्या आजच्या कर्तव्याच्या रंगाचे सर्वसामान्य लोकांमधून हे कौतुक होताना दिसून येते. कर्त्याव्याच्या ‘ खाकी ‘ रंगाला आणि सर्व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post