व्हीएसआरएस मराठी न्युज -काळभोर नगर सूर्योदय कॉंम्पलेक्स,ऐश्वर्म सोसाइटी,मनपा शाळा लगत असलेल्या नाल्या तुन रोज़ केमिकलयुक्त पानी सोडले जाते त्यामुळे परिसरात अतिशय कड़वट वास गेले कितेक महीने हा वास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
त्यामुळे तेथील जेष्ठ नगरीकांना श्वसनाचा त्रास होत आहे खोकला घसा खवखवने, डोळे लाल होने,डोक जड़ होने अश्या प्रकारे नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत मा.आयुक्त यांना काळभोर यांनी पत्र दिले आहे व संबंधित विभागाला देखिल यापूर्वी पत्र दिले आहे.
नागरिकांना नाल्यातील दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांसह इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पालिकेकडून वर्षातून फक्त एकदाच नाला साफ केला जात असल्यामुळे येथील डेंगू, मलेरिया अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे, अशी व्यथा येथील स्थानिकांनी “दै व्हीएसआरएस न्युज . सोबत संवाद साधताना मांडली. “स्थानिक प्रशासनाकडे जेव्हा आम्ही लिखित अर्ज नेऊन देतो त्यानंतर फक्त पावसाळ्यापूर्वीन हा नाला साफ करण्यात येतो. त्यानंतर वर्षभर हा नाला साफ करण्यात येत नसल्यामुळे परिसरातील मच्छर व माशांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे येथे मलेरिया, डेंगू, टायफाईड असे अनेक आजार आम्हाला होऊ शकतो” अशी व्यथा येथील स्थानिकांनी मांडली आहे.
Discussion about this post