व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-कला, गायन, वादन, नृत्य आणि संगीताचा मिलाफ असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवास सोमवारी दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने प्रारंभ झाला. महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.
महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, जयश्री बागुल, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या उपस्थित होत्या.
Discussion about this post