व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी , चिंचवड शहर जिल्हा “आढावा बैठक” आज रागा पॅलेस,काळेवाडी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत दादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
राज्यातील सत्ता गेली आहे. त्यामुळे आता यांचे काही खरं नाही, असे म्हणून जर नगरसेवक आढावा बैठकीला येत नसतील तर त्यांना सांगतो गेलेली सत्ता कधीही येऊ शकते.
प्रत्येकाचा टाइम कधीही बदलू शकतो, असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गैरहजर नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच गैरहजर नगरसेवकांचा यादी पाठवा, अशी सूचना पाटील यांनी केली.
या बैठकीस विभागीय अध्यक्षा मा. वैशालीताई नागवडे, निरीक्षक मा. शीतलताई हगवणे,पिं चि.शहर अध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट व सर्व आजी माजी नगरसेवक,नगरसेविका,पदाधिकारी वकार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
Discussion about this post