व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२२ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात जनसंवाद सभा झाली नाही. मात्र त्यानंतर या सभांचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार आहे.
जनसंवाद सभा पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे. झालेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.
जनता संपर्क अधिकारी
Discussion about this post