व्हीएसआरएस मराठी न्युज –
पुणे शहर पोलिस दलामध्ये बदली होवुन आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची देखील अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी बुधवारी रात्री यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
कुठून कुठे करण्यात आली बदली
1. विजयकुमार वसंतराव पळसुले (ACP Vijayakumar Vasantrao Palsule) (एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे ते एसीपी, आस्थापना, पुणे शहर)
2. जगदिश दत्तात्रय सातव (ACP Jagdish Dattatraya Satav) (ठाणे शहर ते एसीपी, वाहतूक शाखा, पुणे शहर)
3. अप्पासाहेब बाबुराव शेवाळे (ACP Appasaheb Baburao Shewale) (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर)
4. शाहूराव भाऊराव साळवे (ACP Shahurao Bhaurao Salve) (ठाणे शहर ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे शहर)
Discussion about this post