व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुल गांधी विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधीना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे व तसेच खासदारकी रद्द करण्याच्या निर्णया विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांच्यासह गौतम अरकडे, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ,
भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. मनीषा गरुड, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बाबासाहेब बनसोडे, मिलिंद फडतरे, जेव्हीयर ॲन्थोनी, निखिल भोईर, आण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, अमर नाणेकर, लक्ष्मण रुपनर, अबुबकर लांडगे, भास्कर वानखेडे, हरिष डोळस, हिरा जाधव, दहर मुजावर, फिरोज तांबोळी, किरण नढे, दिपक भंडारी, आकाश शिंदे,यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
लोकां मधुन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीचे सदनातील सदस्यत्व आपोआप रद्द होण्याच्या कायद्यातील तरतुदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी अधिनयम 1951 च्या कलम 8(3) ला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून यामध्ये म्हटले आहे की, लोकांमधून निवडून गेलेल्या आमदार किंवा खासदारांना शिक्षा झाल्यानंतर लगेचच सदनाचे सदस्यत्व रद्द होणे हे असंविधानिक आहे. सदस्यत्व रद्द करत असतेवेळी आरोपीचे वर्तन, अपराधाचे गांभीर्य, त्यातील आरोपीची भूमिका याबाबत तपास होणे गरजेचे आहे.
Discussion about this post