व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आषाढी वारी मधला एक अतिशय दैदिप्यमान सोहळा म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व त्यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांची बंधुभेट.
हा सोहळा पूर्वी पंढरपूर तालुक्यतील “टप्पा” या ठिकाणी होत असत.
परंतु आता रस्तरुंदिकरणामुळे ते ठिकाण नाहीसे(अयोग्य) झाल्याने आज या बंधू भेटीसाठी नवीन आणि योग्य अश्या ठिकाणची पाहणी करण्यात आली.
यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे, विश्वस्त श्री. अभय टिळक सर, संत सोपानदेव संस्थान सासवड यांचे अध्यक्ष त्रिगुणजी महाराज गोसावी ॲडिशनल एस पी श्री. हिंमत जाधव व डी वाय एस पी श्री. विक्रम कदम उपस्थित होते.
याबद्दल माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
Discussion about this post